Breaking News

प्लेट पडल्याने कामगार जखमी

जेएनपीटी : प्रतिनिधी

कोप्रोली-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) या मालाची हाताळणी करणार्‍या गोदामात काम करणार्‍या माथाडी कामगारांच्या पायावर प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. किरण तरे असे या कामगाराचे नाव असून, त्याच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) गोदामात सोमवारी (दि. 18) दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्याकडे विचारणा केली असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले; तर ट्रान्स इंडिया (ऑलकार्गो)चे व्यवस्थापकीय अधिकारी श्री अंबादास यांना विचारणा केली असता, ते बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply