पेण ः प्रतिनिधीपेणमधील चिंचपाडा येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वर झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा. चिंचपाडा गाव यांचे आरोपी काका यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील व चुलते हे त्याची जमीन विकून मिळणार्या मोबदल्याचे पैसे देणार नाहीत असे गृहीत धरून फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करू लागले. त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी यांचे वडील गेले असता आरोपी व फिर्यादीचे वडील यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्या वेळी आरोपीने घरातील कोयता फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या वेळी आरोपीच्या हातातील कोयता काढून घेताना त्याने फिर्यादी तसेच इतरांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दुखापत केली. गुन्ह्यातील आरोपीस शनिवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा र. जि. नं. 134/2020 भा. दं. वि. कलम 326, 323, 504, 506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper