महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील साकडी येथील एका तरुणीला काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणातील आरोपींची जागतिक महिला दिनी सोमवारी (दि. 9) जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, पीडित महिलेला न्याय्य मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे.
महाड तालुक्यातील साकडी येथील निहा परवेज धनसे (वय 20) या तरुणीला शुक्रवार (दि. 5) काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मुज्जमीन रउफ ताज, समीर मोहीद्दीन हूरजुक, सउद हसन ताज, आफान इरफान ताज (सर्व रा. साकडी, ता. महाड) व आम्मार (रा. मुंब्रा) यांच्या विरोधात भादवी कलम 143, 147, 354, 354 अ, 354 ब, 452, 323, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना सोमवारी महाड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना जामीन मिळाला आहे. सदर पीडित महिलेला न्याय मिळावा, या साठी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती लढा देणार आहेत.