पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण चालू आहे. येथे मोठ्या संख्येने लोक लसीकरण करून घेण्यासाठी येथे येत असतात. उन्हाची दाहता वाढत असल्याने येथे येणार्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने तात्पुरते निवारा मंडप उभारण्यात आले आहेत. भाजप नगरसेविका संजना समीर कदम यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना तात्कळत उभे राहावे लागते अशी समस्या मांडली होती. उन्हाळ्यामुळे लोकांना येथे उभे राहण्यास कुठेही जागा नसल्याने उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागत होते. याचा सारासार विचार करून नगरसेविका कदम यांनी पनवेल मनपा आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार करून व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी चर्चा केली. याठिकाणी लवकरात लवकर मंडप व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी नगरसेवक नीलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, नगरसेवक नरेश ठाकूर व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी या मागणीचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मंडप उभारण्यात आला. त्यामुळे येथे येणार्या सर्व नागरिकांना आता उन्हाचा कोणताही त्रास होणार नाही. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपांची नगरसेविका संजना कदम, नगरसेवक नीलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, नगरसेवक नरेश ठाकूर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, मा. जिल्हा सरचिटणीस समीर कदम, आनंद मोकाशी, सोनवणे काका, सनी नवघरे आदींनी पाहणी केली. यावेळी तेथे उपस्थित असणार्या नागरिकांनी नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.