Breaking News

आधुनिक एके-203 रायफलींची अमेठीत होणार निर्मिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात रशियाच्या सहकार्याने एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केली.

पंतप्रधान मोदींचे प्रयत्न आणि रशियाच्या सहकार्यामुळे अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात आधुनिक एके-203 रायफलींची निर्मिती केली जाईल. एके-203 ही रायफल आधीच्या एके-47 रायफलची सुधारित आवृत्ती असेल. भारतीय जवानांसाठी या ठिकाणी तब्बल साडेसात लाख आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल, असं संरक्षणमंत्री म्हणाल्या. या रायफल ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत बनणार आहेत. यामध्ये ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डजवळ मेजॉरीटी शेअर 50.5 टक्के तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असणार आहेत.

– ‘सब का साथ सब का विकास’चे अमेठी उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघात 2014नंतर पहिल्यांदाच सभा घेतली. तेथे एके 203 या आधुनिक रायफलनिर्मिती कारखान्याची पायाभरणी केल्यानंतर आपल्या सरकारच्या ‘सब का साथ सब का विकास’ या घोषणेचे अमेठी हे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले. येथील रायफल निर्मिती कारखान्याची पायाभरणीनंतर मोदी म्हणाले की, ‘अमेठीतील या कारखान्यात भारत आणि रशियाच्या संयुक्त सहकार्याने बनवल्या जाणार्‍या आधुनिक रायफल मेड इन अमेठी म्हणून ओळखल्या जातील. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल’. यानंतर बोलताना मोदींनी सशस्त्र दले आणि त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पूर्वीच्या सरकारला दोष दिला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply