Breaking News

कर्जत रेल्वे पोलिसांचा सन्मान

कर्जत : बातमीदार

खंडाळा घाटातील रेल्वे रूळाच्या बाजूला एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत पडली होती. रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला कापडी डोलीतून तब्बल तीन किलोमीटर वाहून कर्जत येथे आणले होते. त्यामुळे तिचे प्राण वाचले होते. जखमी आदिवासी महिलेला वाचविणार्‍या कर्जत रेल्वे पोलिसांचा डोंबिवली येथील महेश सेवा समिती आणि क्रीडा संस्थेने नुकताच सन्मान केला.

खंडाळा घाटात एक माहिला रेल्वे रुळाच्या बाजूला पडली आहे, अशी माहिती मिळताच कर्जत रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. कार्ला आदिवासीवाडीमधील सदर महिलेच्या पायाला आणि पाठीला प्रचंड मार लागला होता. तीन किलोमीटर पायपीट करून रेल्वे पोलिसांनी या जखमी आदिवासी महिलेला डोलीतून कर्जतमधील रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे आशा वाघमारे (रा. कार्ला इरगाव) या आदिवासी महिलेचे प्राण वाचले. या कामगिरीबद्दल डोंबिवली महेश सेवा समितीने कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आंधळे, उपनिरीक्षक तानाजी सरकाळे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गांगुर्डे, निकेश तुरडे, पोलीस शिपाई मंगेश गायकवाड आणि होमगार्ड वसंत लोभी यांचा पगडी घालून सन्मान केला. महेश सेवा समितीचे नामदेव पाटील, क्रीडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रताप माने यांच्यासह हरी बिस्ट, अनिल गायकवाड, संजय भोईर, संजय मोकाशी, संदिप माने, सलवान काळे, मनोहर करण, चंद्रकांत माने, अमोल गोढेवळीकर आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply