Breaking News

काळुंद्रे जि. प. शाळेत येथे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले.पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचे आयोजन करण्यात आल होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, भाजपचे प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, अनंत घरत, वसंत घरत, शाळेचे मुख्याध्यापक भास्कर पाटील, राहुल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना वह्यांचे वाटप केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply