असुन्सिऑन (पॅराग्वे) : वृत्तसंस्था
अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला 2022च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुढील वर्षी होणार्या पहिल्या पात्रता सामन्यातून निलंबित करण्यात आले. 6 जुलैच्या कोपा अमेरिका फुटबॉल
स्पर्धेतील चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला लाल कार्ड दाखवल्यामुळेच पात्रता सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्याचे द. अमेरिकन फुटबॉल महासंघाने जाहीर केले.
निलंबनामागे मेस्सीने अंतिम सामन्यानंतर केलेले विधान कारणीभूत असल्याची चर्चा आहे. ‘कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजकांत भ्रष्टाचारी अधिकार्यांचा समावेश असून, त्यांनी स्पर्धेपूर्वीच ब्राझीलला विजेतेपद मिळवून देण्याचे ठरवले होते,’ अशी खळबळजनक प्रतिक्रिया मेस्सीने व्यक्त केली होती.