Breaking News

असंख्य भाविकांनी घेतले बाप्पाचे दर्शन; अंगारक संकष्ट चतुर्थीचा साधला योग; मंदिरांत गर्दी

उरण : वार्ताहर,प्रतिनिधी

अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेरच्या महागणपतीचरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी मंगळवारी (दि. 23) गर्दी केली होती. निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे. या गावात असणारे महागणपती देवस्थान चिरनेर गावचे ग्रामदैवत आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना श्रीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. त्यांची ही इच्छा अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पुर्ण झाल्याने अनेक भाविकांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दिसत होती.

उरण : उरण येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गणपती देवस्थान चरणी नतमस्तक होण्यासाठी करंजा, भवरा, हनुमान कोळीवाडा, केगाव, मोरा उरण येथील अनेक भक्तांनी मंगळवारी (दि. 23) गर्दी केली होती. उरण शहरातील गणपती चौक येथील गणपती देवस्थान येथील मूर्ती सुमारे 200 ते 250 वर्षांपूर्वीची असल्याने अत्यंत सुंदर मंदिर असून या मंदिरात अष्टविनायक गर्णपतींचे दर्शन होते. लाकडावरील कोरीवकाम सुंदर असल्याने भाविक हे सर्व पाहून आनंदी होत असतात. नागरिक दर्शन घेऊनच बाजारपेठेत जात असतात. मंदिरा समोर दुर्वा, फुले दुर्व्याचे हार, नारळ, फुलांचे हार आदींची दुकाने थाटण्यात आली होती. या मंदिरात रोज सकाळी 7 वाजता व सायंकाळी 7 वाजता महाआरती घेण्यात येते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply