Breaking News

संचारबंदीत लग्न जुळवणार्या भटजीवर गुन्हा दाखल

गुहागर : प्रतिनिधी – सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन असताना गुहागर तालुक्यातील कोसबीवाडी येथे शेकडो वर्‍हाडींना जमवून लग्न सोहळा करणार्‍या दोन्ही बाजूचे यजमान, पोलीस पाटील व भडजीवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या लग्न सोहळ्याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर, पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कदम, माने, आठवले, शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी तपास केला असता, भातगाव कोसबीवाडी येथील अनंत वेले यांच्या मुलाचे संगमेश्वर तुरळ येथील प्रकाश हारेकर यांच्या मुलीबरोबर आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता भातगाव कोसबीवाडी येथे हा लग्न सोहळा पार पडला.

या वेळी दोन्ही बाजूचे वर्‍हाडी मिळून 100 ते 120 जणांची उपस्थिती होती. या वेळी भातगावचे पोलीस पाटील सिद्धोधन मोहिते यांचीही उपस्थिती होती. संपूर्ण देशभर मनाई आदेश असतानाही आयोजकांनी विवाह सोहळा आयोजित करून विवाह सोहळ्यास आदेशाचे उल्लंघन केले. तसेच साथरोग पसरण्याचा संभव असताना जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पोहोचवण्याचा संभव असलेली हयगयीचे व घातकी कृत्य केल्याप्रकरणी वर मुलाचे वडील अनंत वेले, वधूचे वडील प्रकाश हारेकर, विवाह सोहळ्याला उपस्थित पोलीस पाटील सिद्धोधन मोहिते, विवाह लावून देणारे भडजी संजय जोशी यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply