Thursday , March 23 2023
Breaking News

कर्जतमधील धबधबे, धरणांवर जमावबंदी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर येण्यास प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. धबधबे, धरण परिसरात 4 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली असल्याची माहिती कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली.

निसर्गरम्य कर्जत परिसराला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. वीकेंडला येथील धबधबे, धरणांवर तरुणाईची गर्दी होत असते, मात्र या गर्दीत मद्यधुंद होऊन जाऊन वातावरण बिघडविणारे अनेक जण असतात. त्यातून दुर्घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात कर्जतमधील पावसाळी पर्यटनस्थळांवर प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे. यंदाही तसा आदेश जारी करण्यात आला आहे.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply