Tuesday , February 7 2023

नवीन पनवेलमध्ये वॉकेथॉन; 900 विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

इन्फिनिटी फाऊंडेशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने वॉकेथॉन 2019चे आयोजन रविवारी (दि. 24) नवीन पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात सुमारे 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक विषयांचा

संदेश दिला. प्रारंभी पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या वॉकेथॉनमध्ये केएलई महाविद्यालय, फ्लाइंग स्कॉड, सीकेटी महाविद्यालय, एसआयईएस महाविद्यालय, एमएनआर गोल्डन किड्स, किक बॉक्सिंग अँड कुंग फू असोसिएशन, आयएनआयएफडी, भारती विद्यापीठ महाविद्यालय, न्यू बॉम्बे रोट्रॅक्ट क्लब, आरटीसीसीएस, टिळक महाविद्यालय यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर बाईक रॅलीही काढण्यात आली. या वॉकेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक रामजी बेरा, नगरसेविका राजश्री वावेकर, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समाजसेवक व उद्योजक आर. के. दिवाकर आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. शरीरस्वास्थ चांगले राखण्यासाठी चालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply