Breaking News

विराट कोहली अन् पाकिस्तानचा मोहम्मद आमीर एकाच संघातून खेळणार

ढाका : वृत्तसंस्था

बांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेन्टी-20 सामने खेळविण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च रोजी मिरपूर येथील शेरे बांगला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. आशियाई इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व हे खेळाडू करतील.

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती, पण पाकचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली. त्याने 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला, मात्र संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याच मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply