Breaking News

चारचाकी गाडी जळाली

पनवेल ः नवीन पनवेल ते खांदा कॉलनी येथील उड्डाण पुलावर एका चारचाकी गाडीला आग लागल्याने या आगीत गाडी जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लक्षात आल्यानंतर समोरच्या इमारतीत राहणार्‍या राहुल भीमराव पवार या युवकाने दूरध्वनीवरून अग्निशमन दलाला दिली. खांदा कॉलनीच्या दिशेने जाणारी वेगनआर गाडी क्रमांक (एम एच 12 जिके 5385) जात होती. गाडीने अचानक पेट घेतला. या वेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply