Breaking News

भिंगारवाडी बसथांब्याजवळ पाणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील भिंगारवाडी बस थांब्याजवळ चार फूट खोल पाणी साचले होते. पावसाचा जोर कायम असल्याने हे पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक प्रवाशांनी बाहेर पडणे टाळले. पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी (दि. 27) बस बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या वेळी भाजपचे पळस्पे युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, महेश लहाने, प्रमोद ठाकूर, मोहन पाटील, संदेश लहाने, हेमंत ठाकूर, सुमित राणे, मोहिन शेख आदींनी बसमधील प्रवाशांना सुखरूप काढले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply