Breaking News

नेहरू युवा केंद्रातर्फे भादाव गावात स्वच्छता अभियान

पाली : प्रतिनिधी – नेहरू युवा केंद्र अलिबाग यांच्या वतीने आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नितीश दिलीप भादावकर यांच्या पुढाकाराने  भादाव गावात सलग दोन दिवस स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. भादाव युवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि आदिवासी ग्रामस्थ यांच्या

मदतीने हे स्वच्छता अभियान यशस्वी झाले.

पहिल्या दिवशी भादाव आदिवासीवाडी व परिसर, शंकराचे मंदिर व परिसर, कुंभेवाडी भादाव गावाकडील रस्ता, तसेच आदिवासीवाडी ते शंकराचे मंदिर जोडरस्ता येथे तब्बल साडेसात तासांहून अधिक वेळ साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. दुसर्‍या दिवशी मूळगाव भादाव अंतर्गत रस्ते, कचराकुंड्या, हनुमान मंदिर व परिसर, तसेच कालवा रोड ते मूळगाव भादाव जोडरस्ता येथे सुमारे आठ तास साफसफाई करण्यात आली.

नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक नितीश भादावकर यांच्या वतीने राबविलेल्या या स्वच्छता अभियानास हेमंत गोसावी, प्रकाश उभारे, दिलीप भादावकर, गावडे सर, विजय भादावकर, पराग पालपिनकर यांच्यासह युवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि आदिवासी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. सलग दोन दिवस राबविलेल्या या स्वच्छता अभियानामुळे भादाव गाव, आदिवासीवाडी व परिसर चकाचक झाला आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply