Breaking News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

दुबई ः वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सोमवारी (दि. 29) अधिकृत घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून या अजिंक्यपद स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा हाही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत पुढील दोन वर्षांत 27 मालिका होणार असून, त्यात एकूण 71 सामने रंगतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेतून या स्पर्धेची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अँटीग्वा येथे, तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत जमैका येथे होणार आहे. या कालावधीत भारतीय संघ घरच्या आणि परदेशी मैदानांवर प्रत्येकी तीन कसोटी मालिका खेळणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण देण्यात येणार आहेत. जितक्या सामन्यांची मालिका त्यानुसार 120 गुणांची विभागणी प्रत्येक सामन्यासाठी होईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply