उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने बुधवारी (दि.1) एप्रिल रोजी 140 किराणा समान देण्यात आले त्यात कांदे, बटाटे, तुरडाळ, मसाला, साबण, चहा पावडर, साखर, मसूर, हळद, मीठ आदी सामान देण्यात आले. उरण शहरातील डाऊरनगरजवळ असलेल्या लिंबाची कातकरीवाडी व विंधणे कातकरी वाडी येथील राहणार्या कातकरी लोकांना सुमारे 140 कातकरी यांना जीवनावश्यक सामान देण्यात आले. या वेळी लायन्स क्लबचे डीस्ट्रीक चेअरमन लायन सदानंद गायकवाड, डीस्ट्रीक चेअरमन लायन अॅड. दत्तात्रेय नवाळे, लायन्स क्लब ऑफ उरणचे प्रेसिडेंट डॉ. अमोल गिरी, सेक्रेटरी समीर तेलंगे, क्लबचे सर्व सदस्य, तसेच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस नाईक सचिन केकरे, योगेश ठाकूर, खैरनार, लिंबाची आदिवासी वाडी अध्यक्ष मनीष कातकरी आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने दररोज काम करू न हातावर कमवणारे याचे काम बंद झाले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना मदतीचा हात देण्याचे लायन्स क्लब करीत आहे, असे डीस्ट्रीक चेअरमन लायन अॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले.