Breaking News

शिवमुद्रेच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले रायगडावर पोलीस बंदोबस्त

महाड ः प्रतिनीधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून छत्रपती संभाजीराजेंसह केवळ 20 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी (दि. 6) होणार आहे. विशेष म्हणजे यंदा राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे.
संभाजीराजेंच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून सोहळा होणार आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात 6 जून या शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगड येथून करणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे प्रशासन सतर्क झाले असून, कोरोनाचे कारण देत गडाच्या वाटांची नाकेबंदी करून शिवभक्तांना जागीच अडविले जात आहे. त्याचप्रमाणे पाचाड ग्रामस्थांनीदेखील गावबंदी केली आहे, तर पोलिसांनी रायगडाकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली असून, अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply