Breaking News

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशास मुदतवाढ

पनवेल : वार्ताहर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने 1989 साली स्थापन केलेले असून विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रॅण्ड कमिशन (युजीसी) व डिस्टन्स एज्युकेशन ब्युरिया (डीईबी), भारत सरकारची मान्यता आहे.

या मुक्त विद्यापीठाने यशवंत मेमोरियल ट्रस्ट या संस्थेला एमबीए, एमकॉम, बीसीए, बीकॉम, बीए, प्रिपअररोटरी कोर्स ऑफ एसएससी पास-नापास या अभ्यासक्रमाचे अधिकृत अभ्यासकेंद्र म्हणून 2008 पासून मान्यता दिलेली आहे. या मुक्त विद्यापीठाची पदवी इतर पारंपरिक विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष असून विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. एमकॉम, बीसीए, बीकॉम, बीए, प्रिपअररोटरी कोर्स ऑफ एसएससी पास-नापास या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुकांनी 13 ऑगस्टच्या आत यशवंत मेमोरियल ट्रस्ट, अशोक गार्डन, जुन्या पोस्टाजवळ, महात्मा फुले मार्ग, पनवेल, भ्रमणध्वनी 9819248771 किंवा 9819540448 येथे संपर्क साधावा.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply