Breaking News

श्रीनंद पटवर्धन यांना मातृशोक

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन यांच्या मातोश्री मंदाकिनी पटवर्धन यांचे गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धत्वाने निधन झाले.

मंदाकिनी पटवर्धन यांच्यावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल विधानसभा विस्तारक अविनाश कोळी, उद्योजक विलास कोठारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी पटवर्धन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply