Breaking News

वाहन नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी

पेण : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या आदेशानुसार आता 1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन संवर्गातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनीwww.parivahan.gov.in या प्रणालीवर जाऊन ऑनलाईन पेमेंटद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क भरावे व निर्धारित दिवशी निर्धारित वेळी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी खटला विभागातील ना हरकत शेरा घेऊन वाहन पेण तालुक्यातील जिते येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर सादर करण्याचे आवाहन पेण परिवहन कार्यालयाच्या अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे. खटला विभागाच्या शेर्‍याशिवाय वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणी घेतली जाणार नसून 16 फेब्रुवारीपूर्वी ज्यांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क वाहन 4.0 प्रणालीवर ऑफलाईन पद्वतीने भरले, त्या वाहनधारकांना 23 व 24 फेब्रुवारी रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सुविधा देण्यात आली होती, मात्र अपॉइंटमेंट व खटला विभागातील शेर्‍याशिवाय प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणीसाठी स्वीकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply