कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा
नवी मुंबई : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी ठोठावण्यात आली आहे. कर्नाळा बँकेत 500हून अधिक कोटींचा घोटाळा झाला असून त्यात विवेक पाटील यांचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी ठेवीदारांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे पैशांची अफरातफर (मनी लॉण्डरिंग) झाल्याचाही आरोप आहे.