कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेलमधील सिडको समाजमंदिर येथे कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 3) झाले. नवीन पनवेलमधील सिडको समाजमंदिर येथे कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, सुशीला घरत, राजश्री वावेकर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, अजंली इनामदार, अनुराधा पातुरकर, स्वाती कोळी, अभिलाषा ठाकूर, नवीन पनवेल अध्यक्षा शोभा सातपुते, लक्ष्मी चव्हाण, रुचिता जालवेकर, शोभा पन्हाळे, सुजाता पाटील, सरोज मोरे, अनिता भोर, नीता घाटुकडे, शरयु खिरिड, निलाक्षी थळी, शारदा माने यांच्यासह महिला आणि मान्यवर उपस्थित होते.