Breaking News

रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटप

पनवेल ः सिडको अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा सावळे आणि माध्यमिक विद्यालय सावळे येथे मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला. या वेळी आपटा पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनील माळी, सावळे ग्रामपंचायत माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, उपसरपंच सुजाता माळी, माजी उपसरपंच अश्विनी कुरंगळे, ग्रामपंचायत सदस्या अमृता म्हस्कर, छाया केदारी, ज्योती केदारी, शाळेचे मुख्यध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!

‌‘३:३०‌’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …

Leave a Reply