Breaking News

रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रोहे : प्रतिनिधी

रोह्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस चालू असून कुंडलिका नदी तुंडुब भरून वाहू लागली आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. रविवारी (दि. 4) सकाळी 7 वाजता रोहा कोलाड राज्यमार्गावर ग्रेगोरियन स्कूल येथे झाड कोसळल्याने सलग अडीच तास वाहतूक बंद होती. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी वाहतूक पोलीस व रोहा पोलीस यांनी पोहचून या मार्गावरील झाडे बाजूला हटविली. वाहतूक सुरळीत केल्याने तळकोकणात व पुणे या बाजूने जाणार्‍या गाड्या पूर्ववत झाल्या आहेत.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply