Breaking News

सोनारी ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा

जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महेश कडू भरघोस 246 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 978 मते मिळाली; तर त्यांच्या प्रतिस्पर्धी  असणार्‍या महाआघाडीच्या उमेदवार सुजाता दिनेश कडू यांना 732 मते मिळाली. पूनम कडू यांच्या विजयानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.सोनारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीची सत्ता यावी यादृष्टीने सोनारी गावचे माजी सरपंच तथा भाजपचे युवा नेते महेश कडू यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, कृष्णा कडू, प्रकाशशेठ कडू, नरेश कडू, हरिश्चंद्र कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मेघश्याम कडू, रमेश कडू यांच्यासह इतर ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप युतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय सोनारी गावचे श्रद्धास्थान असणार्‍या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने घेतला आणि यश मिळविले आहे. सरपंचपदी भाजप-शिवसेना युतीच्या पूनम कडू विजयी झाल्या. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1मधून अश्विनी हरिश्चंद्र कडू (316 मते), हेमांगी गणेश म्हात्रे यांना (300 मते); प्रभाग 2मधून जगदीश कान्हा म्हात्रे (277 मते), रेश्मा दीपक कडू (269 मते), मेघश्याम नारायण कडू (301 मते); प्रभाग 3मधून रेश्मा नंदकुमार कडू (314 मते), ममता सुरेश कडू (319 मते) या युतीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला.  युतीच्या विजयी उमेदवारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चिटणीस सुनील पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, हेमंत म्हात्रे, ज्येष्ठ नेते कृष्णा कडू, जसखार गावाचे सरपंच दामूशेठ घरत, हरिश्चंद्र कडू, कमळाकर कडू, सोनारी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल, भाजप गाव अध्यक्ष प्रकाशशेठ कडू, नरेश कडू, दयाराम कडू यांच्यासह युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply