Breaking News

शेकापला खिंडार; पनवेल तालुका चिटणीस एकनाथशेठ भोपी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथशेठ भोपी यांनी रविवारी (दि. 4) त्यांच्या असंख्य समर्थकांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदीश गायकवाड, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply