पेण : प्रतिनिधी
महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद व कर्मचारी वेल्फेअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे व कोकण विभागीय नगर परिषद कर्मचारी कबड्डी स्पर्धेत पेण संघाने अंतिम सामन्यात रत्नागिरीचा 26 विरुद्ध 7 अशा 19 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले. इस्लामपूर संघाला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पेण नगर परिषदेच्या मैदानावर झालेल्या या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत पुणे व कोकण विभागातील 40 नगर परिषद कर्मचारी संघांनी सहभाग घेतला होता. पेण संघाने इचलकरंजी, लोणावळा, खोपोली, करमाळा, इस्लामपूर व रत्नागिरी या संघांचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अहमद नालबंद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विजेतेपदाचा चषक पेणचा संघनायक विकास पाटील, शिवाजी चव्हाण यांनी स्वीकारला.
विजेत्या पेण संघाचे शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, प्रशासनाचे प्रमुख अधिकारी राजाराम नरुटे, सर्व विषय समित्यांचे सभापती व कर्मचारीवर्गाने अभिनंदन केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …