Breaking News

रायगड जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नितीन पाटील यांची नियुक्ती

ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल : प्रतिनिधी
उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि डँशिंग व्यक्तिमत्व असलेले नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नितीन पाटील यांचे शनिवारी (दि. 18) पनवेल येथे भाजपच्या तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते.

नितीन पाटील हे अभ्यासू आणि सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवतानाच शहर सरचिटणीस म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस म्हणून आता जबाबदारी वाढली आहे आणि त्या अनुषंगाने ते आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, रायगड जिल्हा भाजप

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply