पाली : प्रतिनिधी
मुसळधार पाऊस व वादळी वार्यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित पंचनामा होऊन या कुटुंबांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.