Breaking News

दरड कोसळली; रोहा-मुरूड रस्ता बंद

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील भालगाव व मिठागरदरम्यानच्या रस्त्यात दरड कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. 6) सायंकाळी घडली. त्यामुळे रोहा भालगावमार्गे मुरूड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने मंगळवारी सायंकाळी झाडांसह दगड व माती भालगाव-मिठागर रस्त्यावर आली. त्यामुळे एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांना विशेषत: कामावर जाणारे लोक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply