मुरूड : प्रतिनिधी
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायगाव नदीने मुरूड तालुक्यात रौद्ररूप धारण केले असून, या नदीकाठच्या वावडुंगी गावाला धोका निर्माण झाला आहे. सलग पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने मुरूड तालुक्यात धुमाकूळ घातला असून, त्यामुळे सायगाव नदीला पूर आला आहे. त्यामुळे वावडुंगी गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.