Breaking News

केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य

देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील केशरी रेशन कार्डधारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. राज्यभरातील लॉकरडाऊनची परिस्थिती पाहता अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती.
कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान आणि देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापैकी मुख्य प्रश्न आहे पोटाचा. कारण संचारबंदी असल्याने शाळा, कार्यालये आणि इतर सर्वच ठिकाणे बंद आहेत, ज्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे. रोजंदारीवर असलेल्यांसाठी तर हा काळ कठीण आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेतली गेली.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply