Breaking News

महसूल विभागाच्या नेरळमधील गोदामाचे वादळी वार्‍याने नुकसान

कर्जत : बातमीदार

नेरळ भागातील रेशन दुकानांचे धान्य साठवण केल्या जाणार्‍या येथील गोदामाचे पत्रे गुरुवारी (दि. 8) सायंकाळी वादळी वार्‍याने उडून गेले. या वेळी पाऊस नव्हता, त्यामुळे गोदामातील 4000 गोण्यांमधील धान्य भिजता भिजता वाचले. दरम्यान, महसूल विभागाने हे सर्व धान्य नेरळमधील अन्य गोदामात हलविले आहे.

नेरळमधील खांडा भागात महसूल विभागाची दोन गोदामे आहेत. त्यातील डॉ. शेवाळे यांच्या दवाखान्यामागे असलेल्या गोदामाचे पश्चिम दिशेकडील पत्रे गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍याने उडाले. नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी घटनास्थळी येऊन गोदामात असलेले धान्य अन्य ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या गोदामात असलेली तांदूळ, गहू आणि तूरडाळ भरलेली पोती शुक्रवारी सकाळपर्यंत इतरत्र हलविण्यात आली.

वादळी वार्‍यात पत्रे उडालेल्या नेरळमधील गोदामाची गुरुवारी संध्याकाळीच पाहणी करण्यात आली. पत्रे उडालेल्या ठिकाणी  तातडीने नवीन पत्रे लावून त्यावर प्लॅस्टिक लावण्यात येईल. त्याचे अंदाजपत्रक तयार करून पनवेल येथे पाठविले जाईल.

-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत

पाऊस आल्यास जी पोती भिजू शकतात, त्यांना आधी हलविण्याचा प्रयत्न केला आहे. या गोदामातील धान्य वनविभाग कार्यालयाच्या मागे असलेल्या गोदामात हलविण्यात आले आहे.

-दिनेश गुजराथी, पुरवठा अधिकारी, कर्जत

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply