Breaking News

पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदी पुलांची पुन्हा दैना ; नव्याने बसविलेले संरक्षक कठडे व रेलिंग गेले वाहून

पाली : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 15 दिवसांत अंबा नदी पुलावरून 5 ते 6 वेळा पाणी गेले आहे. मागील आठवड्यात पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले होते. एमएसआरडीसी प्रशासनाने तेथे नवीन सिमेंटचे कठडे व लोखंडी रेलिंग बसविल्या होत्या, मात्र शनिवार ते सोमवार या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पाली व जांभुळपाडा नदी पुलावरून पाणी गेले आणि तेथे नव्याने बसविलेले सिमेंटचे कठडे व लोखंडी रेलिंग पुन्हा वाहून गेले. परिणामी पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणार्‍या अंबा नदीवरील पाली व जांभूळपाडा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. आता या पुलांवर ठिकठिकाणी खड्डेसुद्धा पडले आहेत. लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडे तुटले आहेत. वारंवार पुराचे पाणी जाऊन हे पूल अधिक धोकादायक झाले आहेत.

पाली व जांभूळपाडा पुलांवरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) पुन्हा नव्याने बसविण्यात येतील. पावसाळा संपल्यावर या पुलांसह या मार्गावरील दोन मोठे पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही योग्य खबरदारी व उपाययोजना करत आहोत.

-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply