Breaking News

सांगली, कोल्हापुरात 223 गावांना पुराचा फटका; 27 जणांचा बळी

सांगली, कोल्हापूर : प्रतिनिधी

सांगली आणि कोल्हापुरातल्या 223 गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे 27 बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. 70 हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे, तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 67 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच सांगलीतही भीषण परिस्थिती आहे. पुराचे पाणी ओसरताना दिसत नाही, तर पूर्वेला टिळक चौक आणि पश्चिमेला सांगलीवाडी इथेही पाणी आहे.

दरम्यान, सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णेची पाचळी 57.5 फूट इतकी झालीय. 65 टक्के सांगली शहर पाण्याथाली आहे. अनेक उपनगरांत, मुख्य बाजारपेठा पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे. सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी तीन पथके, राज्य आपत्ती निवारणच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये चार बोटी व 25 जवान असून एनडीआरएफच्या पथकात प्रत्येकी दोन बोटी व 28 जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून पाच बोटी, तर करमाळ्यावरून पाच बोटी मागविण्यात आल्या आहेत. जवळपास एक लाख 19 हजार 176 नागरिकांचे, तर 25 हजार 260 जनावरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे तब्बल 67 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य पिकांबरोबरच उसालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेय, तर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. पिकाबरोबरच मातीही वाहून गेल्यामुळे नुकसान अधिक होणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply