Breaking News

मुरूडमध्ये घुमणार कबड्डीचा दम!

मुरूड : प्रतिनिधी

श्री काळभैरव क्रीडा मंडळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मैदानात 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या या स्पर्धेत पुरुष गटात 32 संघांना; तर महिला गटात आठ संघांना प्रवेश देण्यात आला आहे.

पुरुष गटात विजयी होणार्‍या संघास चषक व रोख 40 हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल.उपविजेत्या संघास चषक व रोख 25 हजार रुपये प्रदान करण्यात येतील; तर उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख 11 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल. महिला गटात कमी संघांना सहभाग देण्यात आला असल्यामुळे या विभागात अंतिम विजयी होणार्‍या संघाला चषक व रोख 10 हजार रुपये; तर उपविजेत्या संघास रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख चार हजार रुपये देण्यात येतील.

स्पर्धेकरिता तीन क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा. होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply