Breaking News

मोहोपाड्यात बाराशे कार्यकर्ते भाजपत

मोहापाडा ः रामप्रहर वृत्त

येथील जनता विद्यालयाच्या सभामंडपात भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 9) रात्री झाला. या मेळाव्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या वेळी बाराशे कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, विनोद साबले, राजेंद्र पाटील, नंदू सोनावणे, लक्ष्मण पारंगे, माजी उपसभापती रामदास पाटील, उपसरपंच विलास माळी, उपसरपंच मुकेश पाटील, माजी सरपंच किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, माजी सरपंच अविनाश गाताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी रसायनी परिसराची माहिती देत या परिसराला सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाहता येथे नगरपंचायतीची गरज असल्याचे अविनाश गाताडे यांनी बोलताना सांगितले. या वेळी शेकाप, काँग्रेस व शिवसेना पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपतर्फे जाहीर पक्षप्रवेश केला. यात शेकाप ज्येष्ठ नेते वासू मांडवकर, टेंभरी माजी सरपंच भरत म्हात्रे, ज्ञानेश्वर मुंडे, कसलखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील, कसलखंड माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच अजित पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती ज्ञानेश्वर बडे, माजी उपसरपंच अमित मांडे, माजी सरपंच जया पाटील, माजी सरपंच काका गायकवाड, माजी उपसरपंच राजेश भंडारकर, प्रथमेश मालुसरे, माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील, रोमित आत्माराम पाटील, अ‍ॅड. उमेश पवार, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईंर, जनार्दन महाडिक, प्रशांत तांबोळी, बबन पवार, जनार्दन मुंडे, गंगुबाई राठोड, आंबिबाई दोरे, महादू दोरे, छाया केदारी, प्रभाकर जांभुलकर, ज्ञानेश्वर मुंढे आदींसह खालापूर पनवेल तालुक्यातील बाराशे कार्यकर्त्यांनी  शेकाप, काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपत प्रवेश केला.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले, ज्यांना भाजपचे सदस्य व्हायचे असेल त्यांनी 8980808080 या नंबरवर डायल करा, असे सांगताच उपस्थितांतून शेकडो कार्यकर्त्यांनी नंबर डायल करून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. तर भाजपचे महेश बालदी म्हणाले की, मागील निवडणुकीत आम्ही मोहोपाडा आणि चिरनेर भागात मागे पडलो होतो, परंतु आज याच परिसरात शेकडोंचा पक्षप्रवेश झाला. या परिसरात एचपीसीएल व बीपीसीएल यांच्या सीएसआर फंडातून रसायनीत ट्रामा सेंटर बांधून घेणार. मागील निवडणुकीत 16 दिवसांत 34 हजार मते घेतली. या वेळी एक लाख मते घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. घारापुरीपर्यंत वीज पुरविण्याचे काम भाजपने केले. महाराष्ट्रात पहिले शिवसमर्थ स्मारक भाजपने बनविले. कोन-सावला रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दाखविणार, असे बोलताना सांगितले.

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला असणार्‍या गर्दीप्रमाणे पक्षप्रवेश होत आहे. लोहचुंबकाप्रमाणे भाजपकडे कार्यकर्ते ओढले जात आहेत. आपल्या भागात काम करण्याची ताकद महेश बालदीमध्ये आहे. जगात मोदीसाहेबांनी देशाला नाव मिळवून दिले आहे. महेश बालदींना भावी आमदार बनवून दाखवा, असे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून भाजपवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या भागात पाचशे कोटींपेक्षा जास्त कामे महेश बालदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. खर्‍या अर्थाने महेश बालदी यांची विकासकामे करणारा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे.

नागरिकांच्या गरजा काय आहेत हे जाणून महेश बालदी जनतेपर्यंत पोहचत आहेत. आपला लोकप्रतिनिधी हा आपल्यासाठी काम करणारा प्रतिनिधी असावा. येणार्‍या ऑक्टोबर महिन्यात चांगला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मदत करा, त्यांनी भूमिपुत्रांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी जेएनपीटीचा विकास केला. महेश बालदी यांचे सर्वांशी असणारे संबंध हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे आभार किरण माळी यांनी मानले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply