Breaking News

अमन लॉज-माथेरान शटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान पाठोपाठ आता अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे, पण अमन लॉज माथेरान शटल सेवा या मार्गावर कोणतेही दरडीचे प्रकार घडले नाहीत त्यामुळे ही शटल सेवा सुरू करण्याबाबत माथेरानमधील सर्वपक्षीय निवेदन सिनियर डीसीएम यांना देण्यात आले.

माथेरानमध्ये येण्यासाठी मिनिट्रेन किंवा घोड्यावरून पर्यटकांना माथेरानमध्ये आणले जाते. घोड्यांपेक्षा रेल्वेचे दर कमी आणि मिनिट्रेनमध्ये बच्चे कंपनीसह सहल यामुळे येथे आलेले पर्यटक मिनिट्रेनमध्ये आवर्जून बसतात. त्यामुळे मिनिट्रेन ही माथेरानची अस्मिता समजली जाते. या मिनिट्रेनचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक माथेरानमध्ये येतात. पण यापुढे पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडणार आहे. या पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाली. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत तर काही भागात भूस्खलन झाल्याने अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून काल शुक्रवार दि. 9पासून ही सेवा बंद करण्यात आली आहे.

ही शटल सेवा सुरू असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची वर्दळ सुरू होती त्यालाही ब्रेक लागणार असून ही मिनिट्रेन पूर्ववत सुरू राहण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप अध्यक्ष विलास पाटील,   अजय सावंत,  मनोज खेडकर व माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांनी मध्य रेल्वेचे सिनियर डीसीएम अशोक पवार यांची भेट घेऊन ही मिनिट्रेन शटल सेवा सुरू ठेवण्याबाबत निवेदन देण्यात दिले आहे. ही शटल सेवा बंद झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे, यामुळे येथील व्यापारी व दुकानदार धास्तावले आहेत.

माथेरानमध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेच्या नेरळ-माथेरान ट्रॅक वर काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.ही सेवा अनिश्चित काळा साठी बंद केली नसून तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.

-ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply