37 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी
पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेले विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र आले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली. तळोजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी, शेअर मार्केटमधील किरण औटी यांनी पुढाकार घेत आपल्या जुन्या मित्राना भेटण्याचे नियोजन यांनी केले. त्यानुसार नवी मुंबई येथील नवरत्न हॉटेलमध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला.
या विद्यार्थ्यांमध्ये आता बडे राजकारणी, पोलीस, शेअर मार्केट तसेच विविध क्षेत्रात आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका, समाजसेविका त्याचप्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. ज्यांच्या ऋणानुबंध आजही या शाळेशी जोडलेला आहे. अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
शालेय शिक्षणानंतर आपापल्या ध्येयप्राप्तीच्या वाटेवर निघून गेलेले हे सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांनी आनंद झाला, असे तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांनी सांगितले.