पागोटे : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जाणता राजा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक मंडळ पागोटे आयोजित गड-किल्ले व रांगोळी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर छोट्या दोस्तांना व त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना व्यासपीठ मिळावे, याकरिता किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाची कलाकृती ही अगदी अप्रतिम होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक मयुरी जयराम पाटील, द्वितीय क्रमांक गीताश्री सर्वेश तांडेल, तृतीय क्रमांक राजेश्री चेतन पाटील व गडकिल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक शिवमुद्रा ग्रुप पागोटे, द्वितीय क्रमांक पार्थ अमित पाटील, तर तृतीय क्रमांक श्लोक जतीन पाटील, जित रवींद्र पाटील यांनी पटकावला आहे.
स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमासाठी लागणारी सर्व पारितोषिक व रोख रक्कम ही राजू मुंबईकर यांनी दिली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू मुंबईकर, केअर ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, नितेश मुंबईकर, पागोटे गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक मनोहर पाटील, पागोटे गावचे विद्यमान सरपंच अॅड. भार्गव पाटील, महासंघाचे उपाध्यक्ष भारत पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते.