Breaking News

शूरा मी वंदिले..! स्वातंत्र्यवीरांना अभिवादन ; मानिवली हुतात्मा स्मारकात क्रांती दिन साजरा

कर्जत : बातमीदार

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि मानिवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 9) मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. कर्जत पं. स. सभापती राहुल विशे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा हिराजी पाटील यांचे नातेवाईक विठ्ठल पाटील, लीलाबाई तरे, रमेश गवळी, अनसूया जामघरे, वामन गवळी, जयराम गवळी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक शरद भगत, चंद्रशेखर भडसावळे, कर्नल अली अकबर खान यांचा शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कर्जतचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे, मानिवलीचे सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच शुभांगी झांजे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गणेश डायरे, ग्रामविकास अधिकारी विजय राजपूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जि. प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, पं. स.चे उपसभापती काशीनाथ मिरकुटे, जि. प. सदस्या अनसूया पादिर, रेखा दिसले, माजी सभापती धोंडू राणे, कविता ऐनकर, सुरेखा हरपुडे, माजी सदस्य विष्णू झांजे, पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply