Breaking News

बुमराने केली उमेशची पाठराखण

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

जसप्रीत बुमराने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण केली आहे. एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला 14 धावांचा बचाव करता आला नाही. बुमराने 19व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यामुळे उमेशला अखेरच्या षटकात 14 धावांचा बचाव करीत ऑस्ट्रेलियाला 127 धावांच्या लक्ष्यापासून रोखायचे होते.

उमेशच्या शेवटच्या षटकाबाबत विचारल्यानंतर बुमराने आपल्या वरिष्ठ सहकार्‍याचा बचाव करताना सांगितले की, असे घडते, कुठल्याही स्थितीत अंतिम षटकात गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते. सामन्याचे पारडे दोन्ही बाजूला झुकू शकते. अनेकदा यात दोन्ही संघांना समान संधी असते. तुम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करता. तुमची रणनीती स्पष्ट असते. कधी ती यशस्वी ठरते; तर कधी त्यात अपयश येते. यात चिंता करण्याची गरज नाही. आम्ही सामना जिंकण्यास इच्छुक होतो, पण त्यात यश आले नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply