मुंबई : प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी या वेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत.
भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद मिताली राजकडून हरमनप्रीत कौरकडे आले होते. आता हरमनप्रीतनंतर भारताच्या कर्णधारपदाची धुरा स्मृतीकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी स्मृतीला एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती, पण हा सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्हता.
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झांझड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देवल.