Breaking News

जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

उरण : वार्ताहर

जेएनपीटी बंदरातील कामगार वसाहतीच्या (टाउनशिप) प्रवेशद्वाराजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी(दि. 8) उत्साहात झाला.

जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराच काम मुदतीपूर्वी या कामाचा ठेका घेणार्‍या मेसर्स सी.जी.एस. कन्स्ट्रक्शनचे मालक विकास नाईक यांनी पुर्ण केल्याने जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून विकास नाईक यांचे विशेष आभार व्यक्त केले.

या वेळी जेएनपीटी बंदराचे व्हाईस चेअरमन उन्मेष शरद वाघ, मुख्य प्रबंधक सुनिलकुमार मदभावी, जेएनपीटी बंदराचे अधिकारी जयवंत ढवळे, जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी भुषण पाटील, माजी ट्रस्टी रवि पाटील, अंबिका मॅडम सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठेकेदार विकास नाईक यांनी चेअरमन संजय सेठी तसेच इतर अधिकारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply