Breaking News

आमदार चषक कॅरम स्पर्धा ; पनवेल शहर भाजप युवा मोर्चाचे आयोजन

पनवेल ः वार्ताहर

भाजप युवा मोर्चा पनवेल शहर व रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य कॅरम स्पर्धा आमदार चषक 2019चे आयोजन दि. 17 ते 18 ऑगस्ट 2019 रोेजी क्रीडा संकुल हॉल एचओसी कॉलनी पनवेल येथे करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रितम धनाजी म्हात्रे आणि स्ट्राईक अ‍ॅण्ड पॉकीट एकविरा कॅरम क्लब पनवेल यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी निखिल कोशीमकर 8779073907, सचिन नाईक 8850462411 येथे संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी पुरुष एकेरी गटात प्रथम क्रमांक रु. 7777 व चषक, द्वितीय क्रमांक रु. 5555 व चषक, तृतीय क्रमांक 3333 व चषक, चतुर्थ क्रमांक 2222 व चषक, पाच ते आठ उत्तेजनार्थ क्रं. रु. 1111 व चषक, तसेच महिला एकेरी गटात प्रथम क्रमांक रु. 1111 व चषक, द्वितीय क्रमांक 777 व चषक असे आहे. तरी इच्छुकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply