Tuesday , March 21 2023
Breaking News

रोहे आणि नेरळ येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

रोहे ः प्रतिनिधी

श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिनोत्सव सोमवारी (दि. 25) रोहे येथील गजानन ज्ञानदेव चौधरी यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. चौधरी परिवार गेल्या 17 वर्षापासून हा सोहळा साजरा करतात. सकाळी काकड आरती, श्री अभंग सेवा मंडळाचे हेमंत ओक, उदय ओक, प्रकाश कुंठे, बापट बंधू, नंदकुमार धारप यांचे भजन, गणपती पूजन, देवता स्थापना, पूर्णहुती, पुष्पसुष्टी, महाआरती दुपारी हरिपाठ, ह.भ.प. केशव म्हस्के महाराज यांचे प्रवचन, भजन, सायंकाळी आरती आणि धारप यांचे प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. हा प्रकट दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव चौधरी, गजानन चौधरी, ऊर्मिला चौधरी, पुंडलिक भारंबे, रूपाली भारंबे, हरी पांगळे, सतीश भारंबे, भालचंद्र पाटील व स्मिता अरुण करंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कर्जत : बातमीदार

राष्ट्रसंत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त नेरळमध्ये सोमवारी दोन ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांच्या भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

नेरळ येथील पुरातन कुसुमेश्वर देवस्थानच्या सभामंडपात श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या वेळी देवस्थानचे अरुण धारप, तसेच बल्लाळ जोशी, सु. ना. देशपांडे, माधव सुगवेकर आदींनी भक्तांना प्रसादाचे वाटप केले. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या नेरळ येथील श्री गजानन महाराज मंदिरात सोमवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराची उभारणी करणारे संतोष शेळके आणि स्वाती शेळके या दाम्पत्याने महाअभिषेक घडवून आणला. त्या वेळी चोरावले येथील जय डाबाया प्रासादिक भजनी मंडळाचे भजन झाले. आयोजक शेळके कुटुंबीय, तसेच भरत शेळके, दत्तात्रेय शेळके, डॉ. दिनकर सरोदे, डॉ. सुनीता सरोदे, अनंत अत्रे गुरुजी यांनी भक्तांचे स्वागत केले. नेरळ गाव आणि परिसरात राहणारे 3000 हून अधिक श्री गजानन महाराज भक्तांना महाप्रसाद दिला गेला.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply