मोहोपाडा ः स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-पुणे रस्त्यावर चौक ते कलोते अशी तिरंगा बाईंक रॅली भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी काढली. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईंक रॅली काढण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, चौक जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष दर्शन पोलेकर, चौक पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश राणे, मोर्बे अध्यक्ष महेश राणे, तालुका चिटणीस यशवंत जोशी, स्वप्नील मुकादम, प्रमोद राणे, महेंद्र राणे, महेंद्र निकाळजे, स्वप्नील ढोले, शुभम निकाळजे, ओबीसी तालुकाध्यक्ष मनोज साखरे, गणेश गायकवाड, कलोते ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठोंबरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.