Breaking News

पनवेलमध्ये कोविड योद्ध्यांना प्रशस्तीपत्रक

पनवेल ः प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर्स, एएनएम, जीएनएम, वॉर्डबॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर या कोविड योद्ध्यांना मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वाटप गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले.

दोन वर्षांपासून कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी अविरत काम करीत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यासोतबच 12-14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 116 शाळांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. सध्या या लसीकरणाचे नियोजनपूर्वक वेळापत्रक आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाबरोबर, के. व्ही कन्याप्रशाला येथे नुकतेच 12-14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 724 मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply